आगामी निवडणूकांमध्ये भगवा फडकवा-खासदार राऊत

*⚡वेंगुर्ला ता.०९-:* आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे किंवा वेळ आल्यास शिवसेनेला स्वबळावर लढून जिंकायच्या आहेत. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूच कामाला लागावे आणि आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवा असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी आज झालेल्या वेंगुर्ला येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा आज येथील साई मंगल सभागृहात खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर व संफ प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, कुडाळ तालुका प्रमुख राजू शेट्ये, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, संजय गावडे, निलेश चमणकर आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत पुढे बोलताना म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत शासकीय महाविद्यालय चालू करून येथील गोर गरीब विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहोत. त्यासाठी पंतपधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून गरज पडल्यास न्यायालयाच्या माध्यमातून हे महाविद्यालय चालू करणार आहे. चिपी विमानतळाच्या बाबतीत कशा प्रकारे विमाताळाव्यतिरिक्त जमीन शासकीय दराने अल्प मोबदल्यात घेण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केला याचाही पाढा यावेळी खासदार राऊत यांनी वाचला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना वेंगुर्ला-कुडाळ रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तसेच कोरोना काळात अॅब्युलन्स अभावी लोकांचे हाल झाले. यासंदर्भात शिवसेना कार्यकर्त्यांना विचारणा केली गेली असल्याची खंत शिवसेना उपतालुका प्रमुख संजय गावडे यांनी व्यक्त केली होती. यावर कुडाळ रस्त्यासंदर्भात २८ नोव्हेंबरला मुंबईत बैठक झाली. येत्या दोन तीन महीन्यात जिल्हयातील सर्व मुख्य रस्ते केले जातील, असे आमदार केसरकर यांनी सांगितले. सचिन वालावलकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर निलेश चमणकर आभार यांनी मानले.

You cannot copy content of this page