*⚡मालवण ता.०९-:* कुंभारमाठ साळगावरकवाडी येथील ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने तेथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशा मागणीचे निवेदन कुंभारमाठ ग्रामपंचायतीतर्फे वीज कंपनीला देण्यात आले. लवकरात लवकर नवीन टान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन वीज वितरणतर्फे देण्यात आले. कुंभारमाठ ग्रामपंचायत क्षेत्रातील साळगावरकवाडी येथील ट्रान्सफॉर्मर ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या विजेच्या लखलखाटामुळे व ढगांच्या गडगडाटामुळे जळाला आहे. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवरून वीज कनेक्शन असलेल्या ग्राहकांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे घरातील विजेची उपकरणे चालत नाहीत. त्यामुळे याठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली. लवकरात लवकर नवीन टान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन वीज वितरणतर्फे यावेळी देण्यात आले. यावेळी सरपंच प्रमोद भोगावकर, उपसरपंच मनोज वाटेगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळा माने, किशोर पवार, पूनम सावळे उपस्थित होते.
कुंभारमाठ साळगावकरवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी
