खाऊ गल्लीसह अनेक उपक्रम;समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन
*⚡कणकवली ता.०९-:* बालदिनाचे औचित्य साधत समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने 20 नोव्हेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे लहान मुलांसाठी एक दिवस अर्थात ‘किलबिल जल्लोष’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑर्केस्ट्रा, महिला जादूगार,खाऊगल्लीचे खास आकर्षण असणार असूनआमदार नितेश राणे यांच्या हस्ते 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ‘किलबिल जल्लोष’ कार्यक्रमाचे उदघाटन होणार असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गेली दोन वर्षे कोरोना संकटाने सारेच हैराण झाले होते विशेषतः लहान मुलांना आपले बालपण साजरे करता येत नव्हते यासर्वाचा विचार करून हा उपक्रम कोविड नियमांचे पालन करत आयोजित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.यावेळी त्यांच्या समवेत यावेळी गटनेते संजय कामतेकर, बांधकाम सभापती विराज भोसले,अभिजित मुसळे,किशोर राणे, राजू गवाणकर, चारुदत्त साटम आदी उपस्थित होते. पुणे येथील गायक सौरभ दफ्तरदार यांची गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी, थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी जादूगार सुचित्रा इंदुलकर यांचे जादूचे खेळ हे खास आकर्षण असणार आहे. खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना सरप्राईज गिफ्ट मोफत देण्यात येणार आहे. तसेच या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बाल दिनाचे औचित्य साधून केला जाणार आहे.एक दिवस खाऊ गल्ली असणार आहे.लहान मुले व सर्वांसाठी ऑर्केस्ट्रा असरणार आहे,गायक सौरभ दप्तरदार असेल.लहान मुलांसाठी जादूचा प्रयोग असणार आहेत.खेळणी व ८ कार्टून आहेत,मुलांना चॉकलेट देतील. विविध प्रकारचे स्टाँल लागतील,त्यांना मोफत खुर्च्या,टेबल आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत.५०० लहान मुलांना आकर्षक गिप्ट असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आस्वाद घेता येणार आहे. कार्यक्रम ६ वाजता ते १० वाजता होईल. दोन सेल्फी पॉईंट ठेवण्यात येणार आहे.लहान मुलांना मजा मस्ती करता येणार आहे.पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन समीर नलावडे यांनी केले.
