भाजप प्रवक्ते संजू परब यांची टीका
*⚡सावंतवाडी-:* केसरकर यांनी शहरात एक तरी प्रकल्प आणलाच जाहिर करावे फक्त खोट्या घोषणा करून कंपन्या आणल्याचे जाहिर करतात मात्र प्रत्यक्षात एकही प्रकल्प आणलेला नाही त्यामुळे येणार्या नगरपालिका निवडणुकीत केसरकर यांचा दारूण पराभव करणार अशी टीका भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केली आहे
यावेळी भाजपच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली. यावेळी भाजपचे नगरसेवक मनोज नाईक, शहराध्यक्ष अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.
