७२० पैकी ६६६ गुण मिळाले रोझरी इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी
मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कुमार आशय हरिष परुळेकर याने यावर्षीच्या ऑल इंडिया मेडिकल एन्ट्ररन्स परीक्षेत (नीट) ७२० पैकी ६६६ गुण (९९.९७) टक्के मिळवून प्रशंसनीय यश संपादन केले. त्याने एमएचटी- सीईटी परीक्षेत पीसीबी ग्रुपमध्ये ९९.९९ टक्के मिळवून महाराष्ट्रात २२ वा क्रमांक मिळविला. कुमार आशय हरिष परुळेकर याला इतर स्पर्धा परीक्षांमध्येसुद्धा चांगले गुण मिळाले आहेत. त्याने एमएचटी- सीईटी परीक्षेत पीसीबी ग्रुपमध्ये ९९.९९ टक्के मिळवून महाराष्ट्रात २२ वा क्रमांक मिळविला. आयसर पुणेसाठी त्याची पहिल्या फेरीतच निवड झाली आहे. आशयला जेईई परीक्षेत ९७ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. पुढील शिक्षणासाठी आशय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घेणार आहे. त्यासाठी सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
