मसदे ओढ्यात पुलाखाली पाण्यात बुडल्याचा अंदाज
मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील वडाचापाट बौद्धवाडी येथील महेंद्र राजाराम कासले या ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह मसदे येथील ओढ्यात एका झुडपाला अडकलेला अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे दरम्यान, ओढ्यात पुलाखाली हात-पाय धुण्यासाठी गेले असता पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र कासले हे परिसरात वडाचापाट बागायत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काल त्यांचा मृतदेह मसदेच्या ओढ्यात आढळून आला आहे याबाबत पोलीस पाटील विजय पालव यांनी या घटनेची खबर मसुरे पोलीस दूरक्षेत्राला दिल्यावर मसुरे पोलीस कर्मचारी प्रमोद नाईक, विवेक फरांदे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे, तीन मुली, जावई, दोन भाऊ, भावजय, पुतणे नातवंडे असा परिवार आहे. सागर कासले व अण्णा कासले यांचे ते बंधू होत.
