कुडाळ ता-:बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीची दारू वाहतुक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी विकास गावडे आणि आकाश सावळे यांना आज न्यायलयाने प्रत्येकी १५ हजार रूपयांचा सशर्त जामीन मंजूर करून त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम बाबुराव चव्हाण यांनी काम पाहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ, पावशी येथे एका टाटा कंपनीच्या ट्रकवर कारवाई करत ६१,९८,४०० एवढ्या रकमेचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी संशयित दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायलयाने दोघानाही न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अँड परशुराम चव्हाण यांनी न्यायालयात दोघांचे जामीन अर्ज दाखल करण्यात आले होते. यावेळी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही संशयित आरोपींना जामीन मंजूर केले आहेत.
बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना जामीन मंजूर…
