*⚡वेंगुर्ला ता.०६-:* परतीच्या पावसाने दिवाळी सणाला सतत तीन दिवस जोरदार हजेरी लावल्याने सणाच्या उत्साहावर पाणी पडले. दिवाळीच्या सणाला सायंकाळच्यावेळी गजबजणा-या बाजारपेठेमध्ये हवी तशी गर्दी दिसून आली नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई, देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हे सर्व पहाण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी गर्दी करतात. तर लक्ष्मीपूजनादिवशी एकमेकांच्या व्यापार-उद्योगाला भेट देत शुभेच्छा देतात. यावर्षी मात्र, सतत तीन दिवस सायंकाळच्यावेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस येत असल्याने नागरिकांना दिवाळी सणाचा आनंद लुटता आला नाही. लक्ष्मीपूजनादिवशी बाजारपेठेत असणारी गर्दीही ब-यापैकी कमी दिसून आली. परतीच्या पावसाने दिवाळी सणाचा मुहूर्त धरल्याने सर्वस्तरातून नाराजीचे सूर उमटत आहेत.
दिवाळी सणाच्या उत्साहावर पावसाचे पाणी
