माजी नगरसेवक सुनील पेडणेकर : आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी खुलासा करावा
*⚡सावंतवाडी ता.०६-:* महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी एकेरी शब्दात उल्लेख केला, या विधानाचा स्वराज्य संघटना जाहीर निषेध करत आहे, असे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी सांगितले.ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पेडणेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष असो किंवा संघटना असो महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा आदर राखलाच पाहिजे. शिवसेनेसारख्या पक्षात असूनसुद्धा अनारोजीन लोबो असे वक्तव्य करत असतील तर आमदार म्हणून दीपक केसरकर आणि जिल्हाप्रमुख म्हणून संजय पडते यांनी याचा खुलासा करावा, असे आवाहनही पेडणेकर यांनी केले. यावेळी स्वराज्य संघटनेचे अमोल साटेलकर, श्रीपाद नाईक, राजू कासकर आदी उपस्थित होते.
