वेंगुर्ल्यात ८ रोजी ‘हर्षदा पुनर्जन्म‘

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिरात सोमवार दि.८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा ‘हर्षदा पुनर्जन्म‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. आंबा बागायतदार गुरुनाथ वेंगुर्लेकर यांनी हा नाट्यप्रयोग पुरस्कृत केला असून यामध्ये मयुर पवार, तेजस परब, शुभम पवार, अक्षय परब, कौशल नातू, गौरव राऊळ, धीरज घाडी, हर्ष कोचरेकर, बाबल गावडे हे भूमिका साकारणार आहेत. यांना प्रसाद कोनकर, प्रथमेश गुरव, सुभाष कांदळकर यांची संगीतसाथ लाभणार आहे. रंगभूषा चेतन नार्वेकर तर योगेश नाईक, महादेव मेस्त्री, विजय गुरव, अजित दामले यांचे विशेष सहकार्य असणार आहे. तरी या नाट्यप्रयोगाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page