यरनाळकर स्मृती एकांकिका ७ जानेवारीपासून

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* कलावलय, वेंगुर्ला आयोजित स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा दि.७ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीत सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी-वेंगुर्ला येथे सायं.७ ते११ या वेळेत होणार आहेत. स्पर्धेचे हे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना १० हजार, ७ हजार, ५ हजार, उत्तेजनार्थ २ संघांना प्रत्येकी १ हजार व कायम स्मृतिचिन्हे व वैयक्तिक पुरुष, स्त्री अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक अंगे यातील १ ते ३ क्रमांकांना प्रत्येकी १ हजार, ७००, ५०० व स्मृतिचिन्हे देण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश फी ५०० रुपये असून प्रथम येणा-या १५ संघांनाच प्रवेश दिला जाईल. नावनोंदणीसाठी कलावलय अध्यक्ष बाळू खांबकर (९४२२०५५०३९) यांच्याशी संफ साधावा.

You cannot copy content of this page