छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थलांतरण बैठक आता दुपारी होणार ​​

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

*⚡​कणकवली ता.०६-:* गेली अनेक वर्षे स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेल्या कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत निर्णायक बैठक ​८ नोव्हेंबर रोजी सकाळी ​११. ३० वाजता कणकवली नगरपंचायत येथे घेण्यात येणार होती. ​​​पण काही कारणास्तव या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला असून, ही बैठक ​८ नोव्हेंबर​ रोजी ​​दुपारी ​२.३० वा. नगरपंचायतच्या सभागृहात घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या बैठकीचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. गेली तीन वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक घेण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.. ​​

You cannot copy content of this page