आता प्रशासकीय त्रुटी काढत महाराजांचा केला एकेरी उल्लेख;भाजपच्या मोहिनी मडगावकर यांचा सेनेवर आरोप
*⚡सावंतवाडी ता.०३-:* गेली अनेक वर्ष सावंतवाडीची सत्ता हातात असून देखील, ज्यांना कधीच शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा असे वाटले नाही. परंतु, सत्तेत असणारे भाजप पक्षाने जनभावनेचा आदर राखत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी पुढाकार घेतला असताना, प्रशासकीय राहिलेल्या त्रुटी बाबत मार्गदर्शन न करता, आपण प्रशासन चालविण्यास किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आहेत. त्यांनी केलेल्या एकेरी उल्लेखाचा भाजप महिला मोर्चाच्या वतीने शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी स्वराज्य संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत,जाहीर पाठिंबा दिला आहे.
