रांगोळी, आकाश कंदील, ग्रीटिंग कार्ड व किल्ले बनवीत लुटला आनंद
*⚡आंबोली, ता०३-:* सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे विद्यार्थ्यांनी दिवाळी साजरी केली.यावेळी रांगोळी स्पर्धा,किल्ले बनवणे स्पर्धा,आकाश कंदील,ग्रीटिंग कार्ड बनवणे स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्था अध्यक्ष पी.एफ. डान्टस यांच्या हस्ते करण्यात आले. येथील सनिक स्कूल मध्ये दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दीप प्रजोलन संस्थाध्यक्ष श्री डॉ न्ट स, सचिव सुनील राऊळ,कार्यालय सचिव दीपक राऊळ,केंद्रप्रमुख रामा गावडे,,प्राचार्य सुरेश गावडे,कमांडंट कर्नल सुनील सिन्हा,संचालक शिवाजी परब,उपप्राचार्य ऋषिकेश गावडे,शिवराज पवार, जॉनी डिसोझा,श्री,संजय शिंदे,आनंद कुडाळकर,अरुण गावडे, हंबिर राव अडकुरकर,बी के पाटकर,एस.एम जाधव,सतीश आईर, गावडे,पत्रकार अभिमन्यू लोंढे,रुपेश पाटील,महेश पेडणेकर मायप्पा शिंदे,,शिक्षक वृंद,कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी किल्ले बनवणे स्पर्धेत प्रथम क्रमांक रायगड हाऊस,द्वितीय प्रतापगड हाऊस,तृतीय विशाळ गड हाऊस.रांगोळी स्पर्धा _ प्रथम क्रमांक प्रतापगड हाऊस,द्वितीय क्रमांक रायगड हाऊस आणि सिंहगड हाऊस,तृतीय पारितोषिक विशाळगड हाऊस.आकाशकंदील स्पर्धा अनुक्रमे प्रथम प्रतापगड हाऊस,द्वितीय प्रतापगड हाऊस,तृतीय रायगड हाऊस. ग्रीटिंग कार्ड स्पर्धा प्रथम क्रमांक_ विशाळगड हाऊस,द्वितीय विशाळगड हाऊस अशी पारितोषिके विद्यार्थ्यांना देण्यात आली.यावेळी सिंधुदुर्ग लाईव्ह चे रुपेश पाटील यांनी मनोगत वेक्त केले. यावेळी ते म्हणाले, “छत्रपतिंच्या जीवन चारित्र्य आज आत्मसात करण्याची गरज आहे.बक्षिसाची हवा डोक्यात जावू देवू नका.ही प्रेरणा आहे. जीवनात कला जोपासा.गुणवंतांचा जिल्हा आहे ही ओळख कायम ठेवा.”केंद्रप्रमुख रामा गावडे यांनी मनोगत वेक्त केले.,यावेळी पत्रकारांना दिवाळी फराळ भेट देण्यात आली.यावेळी प्राचार्य सुरेश गावडे म्हणाले,यावर्षी दिवाळीची सुट्टी रद्द करून चुकलेला अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे.दिवाळी याच ठिकाणी सर्व विद्यार्थी करणार आहेत.संस्थाध्यक्ष पी एफ डॉन्टस म्हणाले,स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यां मधील सर्जन शिलता आणि कल्पकता यांना वाव मिळतो.सैन्यात जिंकणे हे ध्येय असते.सैन्यात आता बंदुकीची गोळी मारून मारण्याऐवजी जखमी करून त्याला दोन माणसे उचलतात अशी ३ माणसे गुंतवून ठेवतात.त्याप्रमाणे आपण अध्ययनात गुंतले पाहिजे. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल कोरोना काळात सुरू असणाऱ्या शाळेत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.दिवाळीचा हा उत्सव आनंदात साजरा करून सर्वांनी साजरा करूया.”
