शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला नाही; त्यामुळे माफी मागणार नाही…

ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो यांचे स्पष्टीकरण

*⚡सावंतवाडी ता.०३-:* छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरात उभारत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येता कमा नये. अशी आपली भावना आहे. ज्या प्रकारे शहरातील कंटेनर थेटर बाबत जे झालं. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बाबत होऊ नये. अटी शर्ती ची पूर्तता न करताच, प्रस्ताव न पाठवताच भूमिपूजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ५ जणांचे नसून, लाखो करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. असे मत ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण एकेरी उल्लेख केला नसून, माफी मागणार नाही असे स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page