केबलसाठी केलेल्या खोदाईमुळे दुकाने, घरांना धोका

जिओ कंपनीकडून तात्काळ उपाययोजना करावी-: नगरसेवक बाबू कुडतरकर

*⚡सावंतवाडी ता.०३-:* जिओ केबलसाठी शहरासह बाजारपेठेत खोदण्यात आलेले चर धोक्याची घंटा ठरत आहे. ज्या पद्धतीनं रस्ते बुजवण गरजेचं होत ते झाले नसल्याने अपघात होण्याची शक्यता असून, आज शिरोडा नाका येथे एक चारचाकी त्या चरात फसली होती. हा प्रकार ताजा असतानाच भविष्यात अपघाताची शक्यता आहे. त्यात पाणी झिरपून शेजारील दुकान, घरांना धोका संभवत आहे. त्यामुळे जीओ कंपनीकडून तात्काळ यावर उपाययोजना करावी, रस्ता वाहतुकीसाठी पुर्ववत करून द्यावा. भविष्यात आखणीन पाऊस पडल्यास माती आणखीन खाली बसण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच मुख्याधिकारी यांचंही लक्ष वेधणार असल्याची माहिती नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी दिली.

You cannot copy content of this page