मालवणात शिवसेनेचा जल्लोष

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

*⚡मालवण ता.०३-:* दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा ५१ हजार मताधिक्याने पराभव केला. शिवसेनेच्या या विजयाचा जल्लोष मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून मंगळवारी साजरा केला. मालवण शिवसेना शाखा कार्यालय समोर फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती मंदार केणी, महिला तालुका संघटक पूनम चव्हाण, उपशहरप्रमुख बाळू नाटेकर, किरण वाळके, यशवंत गावकर, अरविंद मराळ, उमेश मांजरेकर, प्रसाद आडवणकर, प्रशांत भोजने, आतु फर्नांडिस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page