काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी यांचा सवाल
*⚡सावंतवाडी ता.०३-:* ऐन दिवाळी सनात सत्ताधाऱ्यांनी शहरात प्रत्येकाच्या घरासमोर आणि दुकानासमोर केबल टाकण्यासाठी चर मारून, आगळी वेगळी धूळ आणि आता पावसामुळे चिखलाची रांगोळी घातली आहे. अशी रांगोळी घालून त्यानी नक्की काय मिळवलं असा कडवड सवाल काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी उपस्थित केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, दिवाळी सणात सर्वजण आपले घर, दुकाने स्वच्छ ठेवतात, मग शहराच्या प्रथम नागरिकांनी शहर स्वच्छ का ठेवले नाही. हे काम दिवाळी नंतर देखील करता आले असते, असे मत व्यक्त केले आहे. येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच या सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल असा विश्वास देखील त्यानी यावेळी व्यक्त केला.
