लिंक न मिळाल्याने आयोगाचे आराखडे रखडले

वित्त समिती सभेत झाले उघड

ओरोस-:पंधराव्या वित्त आयोग निधी २०२०-२१ आराखडा भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाला लिंक प्राप्त झाली.मात्र,वित्त विभागाला ही लिंक मिळालेली नाही.ग्राम पंचायत विभागाने आलेली लिंक वित्त विभागाला द्यावी,अशी सूचना करून सुद्धा ग्राम पंचायत विभागाने ती दिली नाही.तसेच बुधवारी झालेल्या वित्त समितीच्या मासिक सभेला ग्राम पंचायत विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहिलेला नाही.त्यामुळे सभेमध्ये सभागृहाने तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची सभा बुधवारी सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी प्रभारी वित्त व लेखा अधिकारी मदन भिसे, सदस्य संतोष साटविलकर, जेरॉन फर्नांडिस, अनघा राणे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मागील तीन सभांप्रमाणे पंधरावा वित्त आयोग निधी खर्चाचा विषय गाजला. यावेळी लिंक न मिळाल्याने कार्यवाही रखडल्याचे वित्त व लेखा अधिकारी भिसे यांनी दिली. आता ही लिंक ग्राम पंचायत विभागाने देणार असल्याचे सांगितल्याचे भिसे यांनी सांगितले. यावेळी भिसे यांनी पंधरावा वित्त आयोग निधीतील बंधीत निधीचा पंचायत समितीचा पूर्ण हप्ता आला आहे. परंतु जिल्हा परिषदेचा पूर्ण हप्ता आलेला नाही, अशी माहिती दिली.

You cannot copy content of this page