उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली १०९ लाभार्थ्यांना मिळाला लाभ
*⚡सावंतवाडी ता.०२-:* नगरषरिदेच्या माध्यमातून आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या सुचनेनुसार उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना नगरपरिषदेनं राखून ठेवलेल्या ३ टक्के राखीव निधीतून १० लाख ६६ हजार शहरातील १०९ दिव्यांग लाभार्थ्यींना अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अनारोजिन लोबो, महिला व बालकल्याण सभापती दिपाली सावंत, भारती मोरे, उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, आनंद नेवगी, मुख्याधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
