कै. अनंत सरवणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन
वैभववाडी प्रतिनिधी उंबर्डे नायदेवाडी येथील अनंत निळकंठ सरवणकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तीन गटात ही स्पर्धा होणार असून रोख रक्कमेसह पारितोषिक देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी १४ नोव्हेंबर पर्यंत निबंध पाठविण्याची अंतिम मुदत आहे. या स्पर्धेसाठी धर्म म्हणजे काय ?आज प्रबोधनाची खरी गरज हा निबंधासाठी विषय आहे.स्पर्धा तीन गटात होणार असून यामध्ये विद्यार्थी(कनिष्ठ व उच्च महाविद्यालय),शिक्षक(प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व प्राध्यापक)व तिसरा गट असणारा तो सर्वसामान्य गट अशा पद्धतीने असणार आहे. प्रत्येक गटासाठी प्रथम पारितोषिक १हजार ५००,द्वितीय एक हजार व तृतीय पाचशे रुपये असणार आहे.निबंध स्वहस्ताक्षरात लिहणे गरजेचे असून तो ए४ पेपरवर असावा.श्रीमती माई सरवणकर माजी सभापती वैभववाडी,नायदेवाडी पो.उंबर्डे ता.वैभववाडी, शेरपुद्दीन महमंद बोबडे ,सरपंच ग्रामपंचायत उंबर्डे,ता वैभववाडी या पत्यावर स्पर्धकांनी निबंध पाठवायचे आहेत.स्पर्धेचे बक्षीस वितरण१९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत उंबर्डे येथे होणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहीतीसाठी शेरपुद्दीन बोबडे ९४२११४४७४१,प्रदीप दळवी-९८१९३११२९२,शशिकांत पवार ९७७३१९२६०९ यांच्याशी संपर्क करावा. तरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
