सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करावे – प्रभारी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या सूचना

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-:* कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबतच्यासूचनाही प्रभारी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिल्या आहेत. देण्यात आलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे. कोविड-१९ च्या पहिल्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेल्या निबंधांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत असतांना अर्थचक्रास चालना देण्यासाठी निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गर्दीव्यवस्थापन, शारीरिक अंतर पाळणे व मास्कचा वापर करण्यामध्ये नागरिकांकडून शिथिलता व निष्काळजीपणा झाल्याने राज्याला कोविड-१९ बाधेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला, कोविड-१९ बाधेच्या लाटेची दुरुक्ती टाळण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अमलबजावणी करून कोव्हीड १९ विषाणूचा प्रसार/संसर्ग/प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करणे तसेच कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत खालीलप्रमाणे उपाययोजना करणेची आहे. १) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येण्याऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. २) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय/ निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी /कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी. ३) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील. ४) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणा-या अभ्यागत/ कर्मचारी/अधिकारी यांना संबंधित अभ्यागत/ कर्मचारी/अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात/आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी) दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील. ५) सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणा-या अभ्यागत/कर्मचारी/अधिका-यांना दंड आकारणी करुन त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी सदर दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिका-याकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी सदर दंडाची रक्कम खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षाखालील असलेल्या जमा सांकेतांकाखाली भरणा करेल. मराठी English महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल (एक) सर्वसाधारण सेवा ००७०- इतर प्रशासनिक सेवा ८०० इतर जमा रक्कम Revenue Receipt (c) Other non- Tax Revenue (1) General services 0070 – Other Administrative Services 800 Other Receipts

You cannot copy content of this page