पालिकेच्या उत्पन्नाची दिली खोटी माहिती; प्रशासनाचा अभ्यास करण्याचा लोबो यांचा सल्ला
*⚡सावंतवाडी ता.०२-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी नगरपालिकेला भेट देऊन, पालिकेचा आढावा घेतला असताना, नगराध्यक्षांना पालिकेच्या उत्पन्न संदर्भात विचारले असताना. त्यांना त्याचे योग्य उत्तर देता न आल्याने चुकीची आकडेवारी सांगत. खुद्द आपल्या नेत्याच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष संजू परब यांनी आदी प्रशानचा अभ्यास करावा असा सल्ला जेष्ठ नगरसेवीका आनोरोजीन लोबो यांनी संजू परब यांना दिला आहे.
