शिवसेना प्रवक्ता नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांची माहिती
*⚡सावंतवाडी ता.०२-:* विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान जिल्हास्तरीय आणि त्यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी शहरातील एकंदर ४१ अधिक ६ अशा ४७ कामांना मंजुरी मिळून सदर कामांची वर्क ऑर्डर प्राप्त झालेली आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ता आणि नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिली. नाले बांधकाम, रस्ता डांबरीकरण, संरक्षक भिंत बांधकाम,ओपन जिम अशा छोट्या मोठ्या कामांना मंजुरी मिळून ती कामे लवकरच सुरू होत आहेत. एकंदर २ कोटी ५१ लाख ९१ हजार रुपयांची ही कामे असून सावंतवाडी शहरातील नागरिकांच्या अनेक समस्यांचे निराकरण होण्यास मदत होणार आहे.
