*⚡वेंगुर्ला ता.०१-:* सिहगर्जना संघटना, वेंगुर्ला तर्फे दिवाळी निमित्त ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पावर हाऊस, वेंगुर्ला येथे रिक्षा सजावट व फिरते आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन केले आहे. रिक्षा सजावट स्पर्धेसाठी ५० रुपये प्रवेश फी असून प्रथम क्रमांकाला ३ हजार तर द्वितीय क्रमांकाला २ हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच फिरते आकाशकंदिल स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला १ हजार तर द्वितीय क्रमांकाला ५ रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहेत. नावनोंदणीसाठी चतुर पार्सेकर (९४२०८४६९०३) किवा साईप्रसाद भोई (७७०९०४२४७१) यांच्याशी संफ साधावा.
रिक्षा सजावट व फिरते आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन
