श्री रवळनाथ दुग्ध सहकारी संस्था भुईबांवडा यांनी दिला दिवाळी बोनस

संस्थेच्या उपक्रमाचे होतेय कौतुक

वैभववाडी प्रतिनिधी श्री रवळनाथ दुग्ध सहकारी संस्था भुईबावडा येथील दूध संस्थेने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये १ लाख ३३ हजार ६२० रूपये दिवाळी बोनस दिला आहे. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी श्री रवळनाथ दुग्ध सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुण अमृत विचारे, उपाध्यक्ष सुरेश दत्ताराम मोरे, सचिव रविंद्र बिले, सदस्य संतोष बळीराम विचारे, श्रीकृष्ण बळीराम विचारे, रामदास नारकर, संतोष मोरे, जनार्दन मोरे, मोहन सुतार, शांताराम देसाई, अनिल देसाई, आदी सभासद उपस्थित होते. या संस्थेचे दैनंदिन दूध संकलन ३५० लिटर आहे. दररोज दूध संकलन होत असल्याचे देखील सभासदांमधून बोलले जात आहे. त्यामुळे संस्था व ग्रामीण शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत आहे. मात्र याठिकाणी जनावरांच्या वाफेसाठी व्हेटरनरी डॉक्टर उपलब्ध नसल्याने कोल्हापूर गोकुळ येथील खाजगी डॉक्टर बोलावून तपासणी केली जाते. डॉक्टर अभावी काही जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता ग्रामीण भाग असल्याने तात्काळ याठिकाणी आरोग्याच्या सेवा उपलब्ध होत नाहीत. तरी शासनाने याठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी सभासदांमधून केली जात आहे.

You cannot copy content of this page