Headlines

४० विद्यार्थ्यानी घेतला सहभाग

आकाश कंदील कार्यशाळा;स्व. टक्के गुरुजी प्रतिष्ठान रिदम प्ले स्कुलचे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी स्व.टक्के गुरुजी प्रतिष्ठान संचलित रिदम प्ले स्कुल वैभववाडी यांच्या वतीने आयोजित आकाश कंदील कार्यशाळेत 40 बालकलाकारांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील दत्त मंदिर परिसरात आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली 14 वर्षे वयोगटापर्यंतच्या जवळपास 40 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना सांगुळवाडी (फाटकवाडी) प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष परब यांनी बांबू पासून आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तर संतोष टक्के व सलोनी टक्के यांनी टाकाऊ वस्तूंपासून व कागद, पुठ्ठा यांपासून आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. सहभागी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकाश कंदील या कार्यशाळेत तयार केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना रिदम प्ले स्कुल परिवारातर्फे आकाशकंदील तयार करण्याचे सर्व साहित्य पुरविण्यात आले. बालवयातच विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत असलेल्या कला कौशल्याचा विकास व्हावा. या प्रमुख हेतू ने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे देखील विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला वाव देणाऱ्या अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संतोष टक्के यांनी सांगितले. आज रविवारी सायंकाळी बनवलेले आकाश कंदिल विक्रिसाठी ठेवले होते. या कार्यशाळेला उद्योजक विकास काटे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेप्रसंगी रिदम प्ले स्कुल चे संतोष टक्के, सलोनी टक्के, मंथन टक्के तसेच शैलेंद्र परब (सर) अंकुश जाधव, संतोष परब (सर) मंदार चोरगे, श्रीराम पळसुले, महेश रावराणे, बंड्या सावंत , ताम्हणकर तसेच अन्य मान्यवर विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page