एसटी डेपोच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

भाजपने विचारला जाब

मालवण दि प्रतिनिधी मालवणच्या नव्या बसस्थानकाच्या इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू होऊन अद्यापही रखडलेल्या स्थितीतच आहे. झालेल्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह आहे. असे सांगत मालवण तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना जाब विचारात धारेवर धरले . मालवण भाजप पदाधिकारी यांनी बसस्थानक रखडलेल्या इमारत ठिकाणी भेट देत पाहणी केली. आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना जाब विचारला. यावेळी चिंदरकर यांनी मालवण बस स्थानक इमारत जीर्ण झाली असून धोकादायक बनली आहे. तरी नव्या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा तालुकाध्यक्ष चिंदरकर यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजू केनवडेकर, गटनेते गणेश कुशे, नगरसेवक दीपक पाटकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, संतोष गावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. *फोटो* : मालवण बसस्थानक नव्या इमारतीचे काम रखडल्या प्रश्नी मालवण तालुका भाजपच्या वतीने आगार व्यवस्थापक यांना जाब विचारण्यात आला त्यावेळी अशोक सावंत,धोंडी चिंदरकर व इतर

You cannot copy content of this page