टोपीवाला हायस्कुलचे वरीष्ठ लिपिक पी के चौकेकर सेवानिवृत्त

मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व शुभेच्छा

मालवण दि प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठतेने काम करणाऱ्या पी. के. चौकेकर यांची सामाजिक क्षेत्रातील कार्याची उंचीही मोठी आहे. परिवर्तनवादी असणाऱ्या चौकेकर यांनी दूरदृष्टी ठेवून काम करताना आपल्या सहकाऱ्यांमध्येही चांगल्या गोष्टी बिंबविण्याचे काम करत समाजात परिवर्तन घडविण्यात मोठे योगदान दिले आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील पी. के. चौकेकर यांचे योगदान भरीव असेच आहे, अशा भावना मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे ज्येष्ठ लिपिक पांडुरंग कृष्णा उर्फ पी.के. चौकेकर यांच्या स्वेच्छानिवृत्तीपर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे एमसीव्हीसी विभागाचे ज्येष्ठ लिपिक पांडुरंग कृष्णा चौकेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने प्रशालेतर्फे त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक डी. एस. खानोलकर यांच्या हस्ते चौकेकर यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय कामत, पदाधिकारी अविनाश आजगावकर, चौकेकर यांच्या पत्नी सौ. प्रज्ञा चौकेकर, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक सुरेश चौकेकर, मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक खानोलकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे शहराध्यक्ष हरेश चव्हाण, बसपा प्रभारी जिल्हाध्यक्ष सुधाकर माणगांवकर, बाळकृष्ण माणगांवकर, बसपा जिल्हा सचिव विजय साळकर, ग्रंथपाल सुमित मसुरकर, प्रा. एच. के. साटम, प्रा. सुविधा तिनईकर, सेवानिवृत्त शिक्षिका रंजना कदम, सौ. स्नेहा सावंत, कर्मचारी माधवी तिरोडकर, सौ. परब, सौ. सुतार, श्री. पाटील, पाटकर, श्री. लांबर, श्री. मालवणकर, तारी, सौ. प्रतीक्षा कदम आदी व इतर उपस्थित होते. यावेळी विजय चौकेकर यांनी लहानपणापासून कष्टमय व संघर्षमय जीवन जगत पी. के. चौकेकर यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकस्पद आहे असे सांगितले तर समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध संघटनांच्या माध्यमातून चौकेकर यांनी केलेले कार्य मौलिक असेच आहे असे सुधाकर माणगावकर म्हणाले. यावेळी मुख्याध्यापिका गोसावी, प्रा. साटम, रंजना कदम, संग्राम कासले,हरेश माणगांवकर, डी एस खानोलकर सुविधा तिनईकर, यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना पी. के. चौकेकर म्हणाले, आपण जीवनात राष्ट्र पुरुषांचा आदर्श ठेवून वाटचाल केली. शिक्षण सेवेशी प्रामाणिक राहतानाच समाजासाठी काम केले. चुकीच्या गोष्टी बदलण्यासाठी तसेच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण नेहमीच कार्यतत्पर राहिलो. यापुढेही समाजासाठी झटत राहू, असेही चौकेकर म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. सौ. अस्मिता रावराणे यांनी केले तर आभार सुमित मसुरकर यांनी मानले.

You cannot copy content of this page