मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज वायरी येथील आर.जी.चव्हाण कार्यालयात गरीबी हटाओ चा नारा देत सर्व घटकांच्या प्रगतीसाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या, आपल्या कणखर नेतृत्वाने जागतिक राजकारणात भारताला सक्षम बनवणाऱ्या भारताच्या माजी पंतप्रधान आर्यन लेडी’ स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोहपुरुष स्व. वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त पुण्यस्मरण करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी,मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघ प्रवक्ते अरविंद मोंडकर, जेष्ठ पदाधिकारी आप्पा चव्हाण, संदेश कोयंडे, सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, मधुकर लुडबे, संजय धुरी, योगेश्वर कुर्ले, युवक तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, युवक शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, उपाध्यक्षा ममता तळगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांनी माजी पंतप्रधान इंदिराजींनी गोरगरिबांना, सर्व सामान्याना दिलेला न्याय तसेच गरिबी हटाव साठी केलेले प्रयत्न यावर भाष्य करतानाच सध्याच्या केंद्रातील मोदी सरकारने गरीब आणि सामान्य, जनतेची केलेली फसवणूक यावर परखड मत व्यक्त केले तर स्व. इंदिराजींच्या राजकीय नेतृत्वाची क्षमता त्यांनी घेतलेले निर्णय व महिला असूनही देशासाठी केलेलं काम हे आजही प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याचे मत ममता तळगावकर यांनी व्यक्त केले
काँग्रेसने साजरी केली इंदिरा गांधी पुण्यतिथी व वल्लभभाई पटेल जयंती
