*⚡मालवण ता.३१-:* वायरी भूतनाथ येथील प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या निवासस्थानी भूतनाथ नूतन नाट्य समाज या नाट्य मंडळातर्फे ५ नोव्हेंबर रोजी मराठी नाट्य रंगभूमी दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त संध्याकाळी ७ वा. नटराज मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. तरी सर्व नाट्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
वायरी येथे रंगभूमी दिन कार्यक्रम
