माजी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेद्र सोपल यांना उद्या श्रद्धांजली वाहणार

*⚡कणकवली ता.३१-:* शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील उच्च अधिकारी स्व.नरेंद्र सोपल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १ नोव्हेंबर २०२१ रोजी दु.४वा जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाचे माजी सहसंचालक नरेंद्र सोपल यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रच्या क्रीडाक्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात ही त्यांचे भरीव असे योगदान आहे त्यांच्या या कार्याला उजाळा देण्यासाठी नरेद्र सोपल यानां सिंधुदुर्गाच्या क्रीडा क्षेत्रातून श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी, खेळाडू यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण यांनी केले आहे .

You cannot copy content of this page