शारदोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन कला महोत्सव स्पर्धांचा निकाल

मळेवाड केंद्राच्यावतीने आयोजन : स्पर्धांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*⚡सावंतवाडी ता.३१-:* शारदोत्सवानिमित्त मळेवाड केंद्राच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन कला महोत्सव स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. या महोत्सवात घेण्यात आलेल्या एकपात्री अभिनय स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, नक्कल स्पर्धा, नृत्य स्पर्धा, भक्तीगीत गायन स्पर्धांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिवर्षी श्री सरस्वती पूजन हा कार्यक्रम सर्व शाळांमध्ये पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. परंतु सध्या कोविड-१९ च्या कारणास्तव यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. या समस्येवर मात करत सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड केंद्राने अत्यंत कल्पकतेने ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गाला नवीन संधी उपलब्ध करून दिली. या ऑनलाईन स्पर्धेमुळे शारदोत्सवासह स्पर्धेचा आनंद घेत अंगीकृत कौशल्याला वाव मिळाला. या स्पर्धा लहान गट (इयत्ता पहिली ते पाचवी) व मोठा गट इयत्ता सहावी ते सातवी अशा दोन गटात पार पडल्या. केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव लक्ष्मण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या संयोजनात केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहभाग घेतला. केंद्र स्तरावर निवडक व्हिडिओमधून निवडलेले विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे लहान गट इयत्ता पहिली ते पाचवी) एकपात्री अभिनय स्पर्धा-नक्षत्रा उमेश गावडे (मळेवाड नं.१), तन्वी अनिकेत सातार्डेकर (मळेवाड नं.३), श्रेया श्याम मोरजकर (मळेवाड नं. २), वेषभूषा स्पर्धा- गौरी नारायण मुळीक (मळेवाड नं. २), आराध्या भूषण पाटील (मळेवाड नं. १), सानवी रूपेश शेळके (न्हावेली १), नक्कल स्पर्धा- नक्षत्रा उमेश गावडे (मळेवाड नं. १), संभाजी संतोष निर्गुण न्हावेली १), प्रथम प्रशांत आरोंदेकर (न्हावेली नं. ४), नृत्य स्पर्धा- रिया मसूरकर (मळेवाड नं. २), धनश्री चंद्रोजी गावडे (मळेवाड नं. १), प्रांजल गावडे (न्हावेली १), भक्तिगीत गायन-स्पर्धा संचित सुनील गोवेकर (मळेवाड नं. ३), तेजस्विनी रमेश धाऊसकर (न्हावेली १), श्रेया संजय उक्षेकर (मळेवाड नं. २) तर मोठा गट (सहावी ते सातवी) एकपात्री अभिनय स्पर्धा- प्राची मदन मुरकर (मळेवाड नं. १), वेशभूषा स्पर्धा- प्राची मदन मुरकर (मळेवाड नं. १), अंतरा शैलेश पाटेलकर (मळेवाड नं. २), साक्षी संतोष नाईक (न्हावेली १), नृत्य स्पर्धा- प्रिया सुरेश मसूरकर (मळेवाड नं. २), निधी एकनाथ दळवी (न्हावेली १), प्राची चंद्रोजी गावडे (मळेवाड नं. २), भक्तीगीत गायन स्पर्धा अंतरा शैलेश पाटेलकर (मळेवाड नं. २), श्रावणी लवू धाऊसकर (न्हावेली १), आर्या मिलिंद मुळीक मळेवाड नं. २) या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी संध्या बिबवणेकर, वेशभूषा स्पर्धेसाठी सदानंद कुंभार, नक्कल स्पर्धेसाठी नम्रता देऊलकर, नृत्य स्पर्धेसाठी सीमा राठोड तर भक्तीगीत गायन स्पर्धेसाठी सीमा देवण पंच म्हणून लाभले.

You cannot copy content of this page