सावंतवाडीतील जनतेवर गेल्या दोन वर्षातच पाणीटंचाईचे संकट…

आमदार दीपक केसरकर : आलिशान केबिनमध्ये बसून सत्तेच्या जीवावर पालिकेत बडेजाव

*⚡सावंतवाडी ता.३१-:* शहरात यापूर्वी कधीच पाणीटंचाई निर्माण झाली नव्हती, परंतु, गेल्या दोन वर्षातच सावंतवाडीतील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी ही सावंतवाडीची परंपरा असून, आम्ही सत्तेच्या जीवावर पालिकेत कधीही बडेजाव केला नाही. ज्यांना आलिशान केबिन आणि सभागृहात वावरायच असेल त्यांनी वावराव मात्र आम्ही आमची परपंरा कायम राखू असा पलटवार आमदार दिपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर केला आहे. ते आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तर रस्ते,पुल,गटार, भिंती अशा तब्बल 47 कामांना विविध योजनेअंतर्गत पैसे उपलब्ध करून दिले आहेत ही कामे लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page