वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक डॉ. अमेय देसाई यांचा शहर भाजपकडून करण्यात आला सत्कार…

शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केला सत्कार….

सावंतवाडी-:भाजपा वैद्यकिय आघाडी चे प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांनी प्रथमच पदभार स्वीकारल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवुन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत भेडसावणारया समस्या जाणून घेतल्या . तसेच त्या समस्या सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले . यावेळी सावंतवाडी येथे आले असताना सावंतवाडी भाजपा कार्यालयात त्यांचा सत्कार सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे व बांदा मंडलाचे अध्यक्ष महेश धुरी यांनी केले. तसेच त्यांच्या सोबत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जनसंपर्क अधिकारी अनिल म्हात्रे यांचाही सत्कार करण्यात आला . यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , आय. टी.सेलचे केशव नवाथे , महिला मोर्चा च्या मोहिनी मडगांवकर , नगरसेवक आनंद नेवगी , शहर सरचिटणीस विनोद सावंत , बांदा मंडलाचे सरचिटणीस मधुकर देसाई , डेगवे सरपंच प्रविण देसाई, कीसन मोर्चा चे जि.चिटनीस अजय सावंत , महिला मोर्चा च्या बेला पींटो इत्यादी उपस्थित होते .

You cannot copy content of this page