नगर वाचन मंदिरात ग्रंथप्रदर्शन संपन्न

*⚡मालवण ता.२२-:* भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मालवण येथील नगर वाचन मंदिराच्यावतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. कलाम यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे नियमित ज्येष्ठ वाचक श्री. दिपक सरमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे ग्रंथपाल संजय शिंदे, श्रेया चव्हाण, यशश्री मालंडकर व वाचक उपस्थित होते. या ग्रंथप्रदर्शनामध्ये कथा, कादंबरी, तत्वज्ञान, विज्ञान, धर्म, नाटक, काव्य, ललित वाड्मय, इतिहास, भूगोल आदी विषयांवरील ग्रंथ मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन १४, १६, १७ ऑक्टोबर असे तीन दिवस वाचकांसाठी खुले होते. या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासोबत ग्रंथवाचन या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम कोरोना प्रादुर्भाव विषयक सर्व नियम पाळून करण्यात आले.

You cannot copy content of this page