सिंधुदुर्ग महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

*⚡मालवण ता.२२-:* भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयामार्फत ऑन लाईन पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ.उज्वला सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्यांनी डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करून वाचनाचे महत्व सांगितले. यावेळी प्रा.डी.व्ही.हरगिले, राबते के.के, प्रा.एम.आर.खोत, प्रमोद खरात यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी आयोजित ऑन लाईन पुस्तक प्रदर्शनाची लिंक विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर पाठवून ग्रंथ प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले. यानिमित्त ओपन रिसोअर्स मटेरिअलच्या लिंक विद्यार्थ्याना उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रंथपाल संग्रामसिंह पवार यांनी केले तर आभार प्रा.के.के.राबते यांनी मानले.

You cannot copy content of this page