दशावतारी कलावंत अनिल खरात बेपत्ता

*⚡कुडाळ, दि.२२-:* माणगाव खोऱ्यातील मोरे येथील दशावतारी कलावंत अनिल खरात हे दिनांक १६ ऑक्टोंबर पासून बेपत्ता आहेत. त्याबाबत ची खबर त्यांची पत्नी अनिता अनिल खरात यांनी कुडाळ पोलिसात दिली अनिल खरात यांनी १६ रोजी कुडाळ येथील एसटी बस स्थानकावरून आपल्या भ्रमणध्वनीवरून पत्नीशी संवाद साधला होता. त्यावेळी आपण घरी येत असल्याचे त्याने पत्नीला सांगितले होते. परंतु ते त्या दिवसापासून घरी आले नसल्याने शोधाशोध केली असता आढळून न आल्याने अखेर अनिता खरात यांनी कुडाळ पोलिसात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

You cannot copy content of this page