भेडशी कॉजवेला मोठा चर

अपघात होण्याची भीती;तात्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थाची मागणी

*⚡दोडामार्ग ता.२२ सुमित दळवी-:* दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावरील भेडशी येथील काँजवेला मोठा चर पडला असुन या चराचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच याठिकाणी अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी याठीकाणी पडलेल्या चरावर काँक्रीटीकरण करण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चर पडल्याने थुंकी लावण्याचे प्रकार संबंधित बांधकाम विभागाकडून झाल्याचे दिसून येते.त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या अपघातास सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार राहील. त्यामुळे अपघात घडण्यापुर्वी या पडलेल्या चराची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारक व स्थानिक गग्रामस्थांमधुन होत आहे.

You cannot copy content of this page