कै. गुरुवर्य प्रमोद सुतार यांच्या शिष्य-परीवारातर्फे २४ रोजी शोकसभा

*⚡कणकवली ता.१९-:* प्रसिद्ध भजन सम्राट मृदुंगमनी तसेच किर्तनकार गुरुवर्य प्रमोदजी सुतार यांचे २ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने सिंधुदुर्ग जिल्हयातील शिष्य परिवार पोरका झाला. संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली.त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील समस्त शिष्य-परीवाराच्यावतीने रविवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक १० वा. ‘भावगंगा सदन’ श्री. पांडुरंग हडकर (कृषी), गावडेवाडी रोड, ओरोस येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोकसभेस सर्व शिष्यगण, हितचिंतक, नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिष्य परीवारांच्यावतीने करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page