नागरिक म्हणून कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक – ऍड. एम. जी. बांदेकर

*⚡मालवण ता.१९-:* कायदा हा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. विविध स्तरावर येणाऱ्या अडचणीत दाद मागण्यासाठी आपल्याला कायद्याचा आधार घ्यावा लागतो. म्हणूनच नागरिक म्हणून कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ऍड. एम. जी. बांदेकर यांनी हेदुळ येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील हेदुळ येथील पूर्ण प्राथमीक शाळा येथे आज़ादीका अमृतमहोत्सव अंतर्गत विधी सेवा प्राधिकरण तर्फे कायदेविषयक मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ऍड. एम. जी. बांदेकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी ऍड. बांदेकर यांनी जमिनी विषयक कायदे, महिला व बाल सरंक्षण विषयक कायदे, ग्राहक संरक्षण कायदा, कौटुंबिक हिंसाचार विषयक कायदे आदी विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला हेदुळचे सरपंच नंदू गावडे, उपसरपंच सौ. दर्शना पुजारे ग्रामपंचायत सदस्य निलेश पुजारे, श्री भगवान कानडे, सौ. आरती गावडे श्रीम. प्रियांका कदम, ग्रामसेविका एम. एस. पिळणकर, पोलीस पाटील श्री रविकिरण सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पुजारे, क्षत्रिय अधिकारी श्री विरेश पवार, वरिष्ठ लिपिक श्री जाधव तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page