राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग, व्यापार प्रदेशाध्यक्ष यांनी ओसरगाव तलावाला दिली भेट
*⚡कणकवली ता.१९-:* राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार उद्योग विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य ओसरगाव तलावाला भेट देत लेकव्ह्यू टुरिझमचा आंनद लुटला. राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी लगत असलेले ओसरगाव तलावाचे निसर्गसौंदर्य थक्क करणारे आहे.ओसरगाव तलाव हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी चे सिंधुदुर्गातील नेते अबीद नाईक यांच्या माध्यमातून बबली राणे यांचे प्रयत्न नक्कीच पोचवू. आणि ओसरगाव तलाव पर्यटनाला चालना देऊ अशी ग्वाही यावेळी नागेश फाटे यांनी दिली. ओसरगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्याशी राष्ट्रवादी चे नेते नागेश फाटे यांची १५ वर्षे जुनी मैत्री आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी आवर्जून आपले मित्र बबली राणे यांच्या ओसरगाव येथील निवासस्थानीही भेट दिली. पंढरपूर तालुक्यातील निवासी असलेल्या फाटे यांनी बबली राणे यांच्या आजी द्रौपदी यांना विठ्ठल रखुमाई ची मूर्ती भेट दिली. यावेळी कल्याण कुसूमडे, वैजनाथ चौरे , विक्रम अवचारे, किशोर ससाने आदी उपस्थित होते.
