*⚡मालवण ता.१९-:* भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात डॉ. कलाम यांच्या जीवनावरील तसेच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य प्रकारातील विविध पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले होते. या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ व असंख्य वाचक वर्ग यांनी घेतला. यावेळी कांदळगाव सरपंच सौ. उमदी परब, माजी सभापती आणि वाचनालय अध्यक्ष उदय परब, ग्राम पंचायत सदस्य रणजित परब, सौ श्रद्धा कुंभार, ग्रामसेवक सागर देसाई, कर्मचारी आशिष आचरेकर, कार्यवाह प्रविण पारकर, खजिनदार गजानन सुर्वे, उपाध्यक्ष दादा परुळेकर, ग्रंथपाल सौ. साक्षी मेस्त्री, कर्मचारी महेश साळकर आदी मान्यवर व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कांदळगाव रामेश्वर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
