साने गुरुजी वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शन संपन्न

*⚡मालवण ता.१९-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस कर्मचारी व नाट्य कलाकार सुशांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सेवांगणचे कोषाध्यक्ष रुजरिओ पिंटो, मनोजकुमार गिरकर, ग्रंथपाल ऋतुजा केळकर, संजय रोगे, सोनाली कांबळी, अदिती कुडाळकर, पंढरी सावंत, रुचिरा चिंदरकर, तेजस्विनी पाताडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page