एसटी अभावी विद्यार्थ्याचे हाल

एसटी सुरू करण्याचे मनविसेची मागणी

*⚡सावंतवाडी ता.१९-:* राज्यात एस टि बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. परंतु, कोरोना नियमांचे पालन करून शाळा कॉलेज सुरू असल्याने, बस फेऱ्या आणि शाळा कॉलेज यांच्या वेळात ताळमेळ बसत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी शाळा कॉलेज व्यवस्थापशी समन्वय साधून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेकडून सावंतवाडी आगार प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मनविसे उपतालुका अध्यक्ष गोविंद मोरये, मनीष पालव, शुभम कोरगावकर, अनुप सोनी,आदी विद्यार्थी सेनेचे पदाधिकार्‍यांच्या वतीने देण्यात आले.शहराध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याअध्यक्ष संतोष भैरवकर लक्ष्मीकांत हरमलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page