गेले ते आपले नव्हते, आहेत ते पवार साहेबांचे

राष्ट्रवादी व्यापार सेल प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे;सावंतवाडी येथे घेतली आढावा बैठक

*सावंतवाडी ता.१९ विनय वाडकर-:* राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत आज सावंतवाडीत उद्योग व व्यापार विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक जण पक्ष सोडून गेले, परंतु जे गेले ते कधीच आपले नव्हते, जे आहेत ते खरे आणि पवार साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. सभागृहातील गर्दी कमी दिसत असली तरी ती गर्दी प्रामाणिक असल्याने ही गर्दी देखील कमी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, पुंडलिक दळवी यांचे जिल्ह्यातील काम उत्कृष्ट असल्याने वेळ न घालवता आणि इतर कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पुन्हा एकदा त्यांची उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी चांगले प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाकडून आणखी बळ देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पूर परिस्थितीत, कोरोना काळात झालेले नुकसान याची योग्य भरपाई त्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उद्योग व व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, भास्कर परब, शिवदत्त घोगळे, श्री. सराफदार, शफिक खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, रिया भांबुरे, सावली पाटकर, जहिरा ख्वाजा, अशोक पवार, बावतीस फर्नांडिस, शैलेश लाड, असलम खतिब, राजू धारपवार, इफ्तिकार राजगुरू, नवीन गांवकर, नवल साटेलकर, आसिफ ख्वाजा, याकुब शेख, नियाज शेख, सिद्धेश तेंडोलकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page