राज्य सरकारकडून अडचणीतील पूरग्रस्त-व्यापाऱ्यांना मिळावी मदत; जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उपमुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्याची केली मागणी
*⚡सावंतवाडी ता.१९-:* राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्याचे सावंतवाडीत स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडी तालुक्याची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांचा सावंतवाडी तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्षा सौ चित्रा बाबर – देसाई यांनी सावंतवाडीतील प्रसिध्द लाकडी फळे त्यांना भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष तथा उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी बोलताना म्हणाले की, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना, तसेच कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना सहकार्य मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधावे असे मत व्यक्त केले.
