मुंबई येथील जयराम बाईत यांच्याकडून श्रावण शाळेला सरस्वती मुर्ती प्रदान

*⚡कणकवली ता.१९-:* मालवण तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर 1 या शाळेला शाळेचे पालक सतीश लक्ष्मण बाईत आणि त्यांचे मुंबईतील बंधू जयराम लक्ष्मण बाईत यांनी अडीच फूट उंचीची फायबर मटेरियल मधील श्री सरस्वतीची मूर्ती देणगी दिली आहे. याबद्दल श्रावण गावामध्ये सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. ही मूर्ती प्रधान करताना त्यांच्या समवेत प्रशांत गवस उपस्थित होते. शाळेला सरस्वतीची मूर्ती प्रदान केल्याबद्दल शाळेच्यावतीने शाळा समितीचे अध्यक्ष शिवराम परब, मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, केंद्रप्रमुख नितीन कदम यांनी बाईत बंधुंचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page