फ्लॉवर फेस्टिवलचे दुसरे पर्व संपन्न

बॅ खर्डेकर कॉलेज व इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन-रोटरॅक्तचा पुढाकार

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला, इंडियन वूमन सायंटिस्टअसोसिएशन-कोल्हापूर शाखा, गार्डन्स क्लब कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फ्लॉवर फेस्टिवल‘ ह्या एका वर्षाच्या ऑनलाईन कोर्सचे दुसरे पर्व संपन्न झाले. यावेळी ‘फ्लोरल फेस्ट फॉर दसरा‘ या थीमवर आधारित पुष्परचनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये गार्डन्स क्लब कोल्हापूरच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी ‘बिडरमायर‘ ह्या पुष्पसजावटीच्या नवीन प्रकाराची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. डॉ. अल्पना चौगुले यांनी ‘फ्लोरल फ्लेस्टून‘ ह्या प्रकारातील अतिशय सुंदर अशी तोरणे करुन दाखविली. कणकवली महाविद्यालयाचे प्रा.डॉ.बाळकृष्ण गावडे यांनी ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता‘ ह्यावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील वनस्पतींचा पूर्वइतिहास व वनस्पतींची चित्र रुपात ओळख करुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी केले. तर आभार रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे उपाध्यक्ष प्रितीश लाड यांनी मानले. नितीन कवठणकर व करिष्मा मोहिते यांनी कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी सांभाळल्या.

You cannot copy content of this page