जागतिक आरोग्य संघटनेने घेतला कोरोना लसीकरणाचा आढावा

नागरिकांच्याही घेतल्या भेटी

वेंगुर्ला प्रतिनिधी-जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने वेंगुर्ल्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण मोहिमेचा आढावा घेतला. तसेच शहरातील नागरिकांच्या भेटी घेत लसीकरण झाल्याची माहिती जाणून घेतले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ.मुकेश जोशी, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.अतुल मुळे, आरोग्यसेवक आर.आर.नाथगोसावी, आरोग्यसेविका व्ही.व्ही.तांडेल यांच्यासह वेंगुर्ला नगरपरिषदेचे कर्मचारी सुधाकर राऊळ आणि स्नेहा कुबल आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page